Dearness Allowance: देशभरातील ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शन लाभार्थी गेल्या काही महिन्यांपासून महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. आता माध्यमांमधील वृत्तांवर विश्वास ठेवल्यास, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी ही वाढ जाहीर करून त्यांना एक मोठे गिफ्ट देऊ शकते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी जलद निर्णय घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही लिहिले आहे.
किती असेल महागाई भत्त्यातील वाढ?
सध्याच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी महागाई भत्त्यामध्ये ३% ते ४% वाढ होण्याची शक्यता आहे.
- सध्या महागाई भत्ता ५५% नोंदवला गेला आहे.
- नवीन वाढीनंतर हा भत्ता ५८% किंवा ५९% पर्यंत पोहोचू शकतो.
- महागाई भत्त्यातील वाढीचा अंतिम निर्णय सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळ घेण्याची शक्यता आहे.
पगारात किती वाढ होईल? (अंदाजित)
महागाई भत्त्यात ४% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार आणि पेन्शनमध्ये खालीलप्रमाणे वाढ होऊ शकते:
- मूलभूत पगारात वाढ: ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार (Basic Pay) ₹१८,००० आहे, त्यांच्या पगारात अंदाजे ₹५४० (3% वाढीनुसार) किंवा त्याहून अधिक वाढ होऊ शकते.
- मूळ पेन्शनमध्ये वाढ: ₹९,००० मूळ पेन्शन असलेल्या लाभार्थ्यांना अंदाजे ₹२७० (3% वाढीनुसार) किंवा त्याहून अधिक वाढ मिळू शकते.
महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?
वाढत्या महागाईचा आर्थिक फटका कर्मचाऱ्यांवर पडू नये यासाठी महागाई भत्ता दिला जातो. हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारासोबत दिला जातो आणि त्याची गणना महागाईच्या दरावर आधारित असते.
- नियम: महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा (जानेवारी ते जून आणि जून ते डिसेंबर या कालावधीसाठी) सुधारणा केली जाते.
- आधार: महागाई भत्ता मोजण्यासाठी CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) या निर्देशांकावर जोडलेले सूत्र वापरले जाते. जेव्हा AICPI-IW वाढतो, तेव्हा महागाई भत्ताही वाढतो.
AICPI-IW ची स्थिती: लेबर ब्युरोच्या आकडेवारीनुसार, AICPI-IW मार्च २०२५ मध्ये १४३ वर होता, जो मे २०२५ पर्यंत ०.५ ने वाढून १४४ वर पोहोचला आहे. निर्देशांकातील ही वाढ DA वाढीसाठी सकारात्मक संकेत देत आहे.