महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; नवीन योजनाची संपूर्ण माहिती पहा Free Gas Cylinder

Free Gas Cylinder : राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली गेली आहे.

योजनेसाठी पात्रता निकष

या योजनेचा लाभ खालील लाभार्थ्यांना मिळणार आहे:

  1. ज्या महिलांच्या नावाने गॅस जोडणी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
  2. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले राज्यातील लाभार्थी.
  3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब.
  4. एका कुटुंबात (शिधापत्रिकेनुसार) केवळ एकच लाभार्थी पात्र असेल.
  5. फक्त १४.२ किलोग्राम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना ही योजना लागू असेल.
  6. या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. या तारखेनंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका पात्र ठरणार नाहीत.

अनुदान आणि कार्यपद्धती

मोफत सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत नियमित पद्धतीने केले जाईल. लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात (DBT – Direct Benefit Transfer) जमा केली जाईल:

लाभार्थी प्रवर्गकेंद्राचे अनुदान (प्रति सिलिंडर)राज्याचे अनुदान (प्रति सिलिंडर)एकूण जमा होणारी रक्कम
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी₹ ३००₹ ५३०₹ ८३० (थेट खात्यात)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी₹ ८३०₹ ८३० (थेट खात्यात)

महत्त्वाचे: ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.

योजनेची अंमलबजावणी

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचे कुटुंब निश्चित करतील आणि लाभार्थ्यांची द्विरुक्ती (duplication) होणार नाही याची काळजी घेतील. Sources

Leave a Comment