After GST Car and Bike Price Dropped: जर तुम्ही नवीन कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. आजपासून (२४ सप्टेंबर) देशभरात ‘जीएसटी २.०’ चे नवीन दर लागू झाले आहेत, ज्यामुळे ऑटोमोबाइल उद्योगात ऐतिहासिक बदल झाला आहे. सुधारित कर दरांमुळे, आता मारुती सुझुकीच्या बजेट कारपासून ते रेंज रोव्हर सारख्या लक्झरी गाड्यांपर्यंत आणि होंडा ॲक्टिव्हा व शाईन सारख्या दुचाकीही लक्षणीय प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत.
जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा फायदा
जीएसटीमध्ये बदल झाल्यामुळे कार उत्पादक कंपन्यांनी थेट ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या कपातीमुळे एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारवर ४० हजार रुपयांपासून ते प्रीमियम लक्झरी एसयूव्हीवर तब्बल ३० लाख रुपयांपर्यंतची प्रचंड बचत होणार आहे.
या कंपन्यांच्या गाड्या किती स्वस्त झाल्या?
- मारुती सुझुकी: मारुती सुझुकीच्या बजेट गाड्यांमध्ये मोठी कपात झाली आहे. Alto K10 ₹४०,०००, WagonR ₹५७,०००, Swift ₹५८,००० तर Brezza ₹७८,००० पर्यंत स्वस्त झाली आहे. सर्वात मोठी कपात Invito वर ₹२.२५ लाख इतकी आहे.
- टाटा मोटर्स: देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Nexon SUV ची किंमत ₹१.५५ लाख पर्यंत कमी झाली आहे. याचबरोबर Tiago ₹७५,०००, Punch ₹८५,००० आणि Harrier ₹१.४० लाख पर्यंत स्वस्त झाली आहे.
- महिंद्रा: महिंद्राच्या लोकप्रिय SUV च्या किमतीतही मोठी घट झाली आहे. XUV 3XO ₹१.५६ लाख आणि Thar ₹१.३५ लाख पर्यंत स्वस्त झाल्या आहेत.
- ह्युंडाई आणि किया: ह्युंडाईच्या Venue वर ₹१.२३ लाख तर Creta वर ₹७२,००० पर्यंत सूट मिळणार आहे. किया सोनेटच्या किंमती ₹१.६४ लाख पर्यंत कमी झाल्या आहेत, तर Carniwal वर ₹४.४८ लाख इतकी मोठी सूट आहे.
- टोयोटा आणि लँड रोव्हर: प्रीमियम सेगमेंटमध्येही मोठी कपात झाली आहे. टोयोटा फॉर्च्युनर ₹३.४९ लाख तर लँड रोव्हर रेंज रोव्हर ₹३०.४ लाख पर्यंत स्वस्त झाली आहे.
दुचाकी खरेदीदारांसाठीही आनंदाची बातमी
केवळ कारच नाही, तर दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठीही ही एक मोठी संधी आहे. भारतातील ९८% दुचाकी बाजारपेठ ३५० सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटारसायकल्स आणि स्कूटर्सनी व्यापली आहे. या दुचाकींवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी घट होणार आहे.
- होंडा: होंडाच्या लोकप्रिय Activa 110 स्कूटरची किंमत ₹७,८७४ ने कमी झाली आहे. याचबरोबर Shine 125 ₹७,४४३ ने आणि Unicorn ₹९,९४८ ने स्वस्त झाली आहे. Honda CB 350 सारख्या मॉडेल्सवर तर ₹१८,८८७ पर्यंत बचत होईल.
- इतर कंपन्या: हिरो, बजाज, आणि रॉयल एनफील्ड सारख्या कंपन्यांच्या दुचाकींच्या किमतीतही मोठी घट होणार आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात विक्री वाढण्यास मदत मिळेल.
या GST कपातीमुळे वाहन खरेदीदारांसाठी हा सर्वोत्तम काळ ठरत असून, ही अभूतपूर्व किंमत कपात ऑटो उद्योगासाठी एक मोठी चालना देईल.