बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRBs) विविध पदांच्या १३,२१७ जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार आता २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. ही अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.
पदांनुसार रिक्त जागांचा तपशील
या भरती अंतर्गत, विविध पदांसाठी जागा उपलब्ध आहेत:
- कार्यालय सहाय्यक (Office Assistant): ७,९७२ जागा
- अधिकारी स्केल-I (Assistant Manager): ३,९०७ जागा
- अधिकारी स्केल-II (General Banking Officer): ८५४ जागा
- अधिकारी स्केल-II (Specialist Officers): २८५ जागा
- कृषी अधिकारी: ५०
- विपणन अधिकारी: १५
- ट्रेझरी मॅनेजर: १६
- कायदा: ४८
- सीए: ६९
- आयटी: ८७
- अधिकारी स्केल-III (Senior Manager): १९९ जागा
अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
- अर्जाची पद्धत: ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ सप्टेंबर २०२५ (पूर्वीची तारीख २१ सप्टेंबर २०२५ होती)
- अर्ज शुल्क: खुला प्रवर्गासाठी ₹८५०/- आणि राखीव प्रवर्गासाठी ₹१७५/-
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- कार्यालय सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवीधर. १८ ते २८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिकारी स्केल-I: कोणत्याही शाखेतील पदवीधर. १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा.
- अधिकारी स्केल-II (जनरल बँकिंग): कोणत्याही शाखेतील पदवी, किमान ५०% गुणांसह. २१ ते ३२ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
- अधिकारी स्केल-II (स्पेशलिस्ट): संबंधित विषयात पदवी (उदा. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, कृषी), किमान ५०% गुणांसह. २१ ते ३२ वर्षे वयोमर्यादा.
- अधिकारी स्केल-III: २१ ते ४० वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया कशी असेल?
- कार्यालय सहाय्यक: पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा.
- अधिकारी स्केल-I: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
- अधिकारी स्केल-II आणि III: एकल परीक्षा आणि मुलाखत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा. ही सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे.